खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा;देह विक्री करणाऱ्या वारांगनासह दोन आंबट शौकीन ताब्यात…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात पोलिसांनी छापा टाकून कुंटनखाना चालवणाऱ्या महिलेला अटक करून पिटा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की गांधलीपुरा भागात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळल्यावरून डी.वाय.एस.पी.रफिक शेख आणि पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पथक तयार करून १६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जाकीराबी शकीलाबी शेख या महिलेच्या घरी छापा टाकला असता त्याठिकाणी साक्री तालुक्यातील उभांड वरधाने येथील हेमंत बन्सीलाल पाटील व धुळे तालुक्यातील वरखेडे येथील विकास धर्मा पडोळकर हे वेगवेगळ्या खोलीत पीडित महिलांसोबत आढळून आले पोलिसांनी चौकशीत पीडित महिलांनी सांगितले की घर मालकीन आमच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेते व ग्राहकाकडून मिळलेले ५०० रुपये पैकी मालकीन ३०० रुपये घेते आणि २०० रुपये आम्हाला देते पोलिसांनी पीडितांचा जबाब घेऊन मालकीन जाकिराबी शेख शकीलाबी यांना ताब्यात घेतले छापा टाकणाऱ्या पथकात डी.वाय.एस.पी.रफिक शेख,पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर,पी.एस.आय.यशोदा कणसे, हेडकॉन्स्टेबल संगीता मोरे,विजय साळुंखे,किशोर पाटील, प्रदीप पवार,सुनील हटकर,रवींद्र पाटील,रेखा ईशी,योगेश महाजन,योगेश पाटील,प्रमोद पाटील,प्रवीण पारधी,सुनील पाटील आदींचा समावेश होता पारोळा पोलीस स्टेशनचे पी एस आय यशोदा कणसे यांनी फिर्याद दिल्यावरून जाकिराबी शेख हिच्याविरुद्ध महिलांचा अनैतिक व्यापार कायदा १९५६ च्या कलम ३,४,५,६,७, प्रमाणे पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button