खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नंदगाव येथे दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ठरले आकर्षण

शंभरावर तरुणांना दिले मोफत लाठीकाठीचे प्रशिक्षण

 

अमळनेर (प्रतिनिधी)  स्पार्क फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त दि. १२ रोजी तालुक्यातील नंदगाव येथे ऐतिहासिक दुर्मिळ शिवकालीन शस्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी शंभरावर तरुणांना लाठी काठी प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन प पू श्री श्री १००८ ईश्वरदासजी महाराज, श्री गोविंदासजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पार्क फाउंडेशनचे पंकज दुसाने यांनी पंचवीस वर्ष प्रयत्नातून जमवलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. सकाळी ११ वाजता प.पू. ईश्र्वरदासजी महाराज यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठ्यांनी युद्धात वापरलेल्या तलवारी, कट्यार, कुऱ्हाडी, सूरी, बिछवे, चिलखत, वाघनखे, ढाली, तोफगोळे अशी दुर्मिळ शस्त्रे पाहण्यास मिळून त्यांचा इतिहास जाणून घेण्यात आला. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत नागपूर येथील हितेश डफ यांनी शंभरावर तरुणांना मोफत लाठी काठी व ढाल तलवार प्रशिक्षण दिले.तरी या प्रदर्शनाचा व प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी ही घ्यावा, असे आवाहन स्पार्क फाउंडेशनने केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button