खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

राज्यपालांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा पुरस्काराने गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यपाल रमेशकुमार बैस यांच्या हस्ते  प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना ‛नवभारत के शिल्पकार’पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबई येथील ताज हॉटेल मध्ये हा सत्कार करण्यात आला.

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पदभार घेतल्यापासून दरवर्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अमळनेर नगरपालिकेला उत्तम गुणानुक्रम मिळत आहे. सुरळीत पाणी पुरवठा , सौर ऊर्जा प्रकल्प राबवून वीज बिल  कमी करणे , रस्त्यांची गुणवत्ता सुधारून रस्त्यांची वाढीव बिले कमी केली होती. नवोपक्रम आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून अत्यावश्यक विकासकामे केलीत.  कर्मचाऱ्यांना शिस्त उत्तम प्रशासकीय कारभार राबवला म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे हा पुरस्कार दिला. नुकतीच अमळनेर नगरपालिका नाशिक विभागात प्रथम आणि मुख्याधिकारीना पुरस्कार हा दुहेरी सन्मान मिळाल्याने मंत्री अनिल पाटील ,माजी आमदार  साहेबराव पाटील , माजी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार शिरीष चौधरी  , माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील सर्वपक्षीय अभिनंदन करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button