अमळनेर(प्रतिनिधी) येथे होणऱ्या जाणाऱ्या अखिल भारतीय आणि विद्रोही साहित्य संमेलन निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे आदेशान्वये नगर परिषद मार्फत महास्वच्छता अभियान राबविले जात आहे. दिनांक ११ जानेवारी रोजी बोरी नदी पात्र येथे सर्व सफाई कर्मचारी, अधिकारी, मुकादम,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे,हैबतराव पाटील यांच्यामार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. दिनांक 2 – 4 फेब्रुवारी दरम्यान भरविले जाणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्ते सफाई, नाले, मैदान, आवारात साफसफाई केली. सदर अभियान दरम्यान जवळपास 2 टन कचरा जमा करण्यात आला.