अमळनेर(प्रतिनिधी) आमदार अपात्रताप्रकरणी अध्यक्षांनी दिलेला निकाल लोकशाहीला मारक असल्याच्या भावना व्यक्त करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटातर्फे निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आला. शहरातील मंगलमूर्ती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या.यावेळी नाना ठाकूर, विजय पाटील,चंद्रशेखर भावसार, सचिन पाटील, मोहन भोई, बाळासाहेब पवार,देवेंद्र देशमुख,बी.यु.पाटील,रवींद्र पाटील, महेश कदम, विलास पवार, अनंता निकम, उज्वला कदम,राजू मराठे,मनीषा परब तसेच शिवसैनिक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.