अमळनेर बस आगारात रस्ते अपघात सुरक्षा सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन

अमळनेर(प्रतिनिधी) येथील बस आगारात रस्ते अपघात सुरक्षा सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी रस्ते अपघात, सुरक्षा व सुरक्षितता या विषयावर उपस्थित मान्यवारांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे, रा.प.महामंडळाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक माधवराव देवधर,आगार प्रमुख इम्रान पठाण,सहाय्यक वाहतूक अधीक्षक . एस. चौधरी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर उपस्थित होते. चालक, वाहक,तसेच यांत्रिक व प्रशासन विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुषार पाटील,सतीश सातपुते,भारती धनगर,व्ही.आर.चौधरी,एस.आर. भारंबे यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन सोनाली धनगर यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *