खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

वावडे येथील शिक्षक निरंजन पेंढारे यांना नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड

अमळनेर (प्रतिनिधी) जुनागड, (गुजरात) येथे झालेल्या ४थ्या भारतीय सायन्स टेक्नो फेक्टिवल मध्ये तालुक्यातील वावडे येथील बी. बी. ठाकरे हायस्कूल येथील उपक्रमशील विज्ञान शिक्षक तथा अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांना यावर्षीचा नॅशनल बेस्ट सायन्स टिचर अवार्ड देऊन गौरवण्यात आले.

 विज्ञान प्रसारच्या क्षेत्रातील रमण सायन्स अँड  टेक्नोलोजी फाउंडेशन ,भारत, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट ,इंडिया, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौंसिल ऑफ यंग  सायंटिस्ट, श्री सरदार पटेल शैक्षणिक ट्रस्ट्र, जुनागड (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रमण सायन्स अँड  टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. चंद्रमौली जोशी, इसरोचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. जे.जे. रावल,डॉ.दिलिप भट, डॉ. भरतभाई चनेरिया, चंद्रयान-3 च्या सेन्सर च्या प्रोजेक्ट हेड डॉ. माधवी ठाकरे, अमेरिकेतील नासाच्या वैज्ञानिक डॉ. रुतू पारेख ,गुजरातचे डि.आय. जी. निलेश झांझडिया, जुनागढ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ चेतन त्रिवेदी, नागपूरचे डॉ. सुरेश अग्रवाल, भारताचे प्रसिद्ध मॅथ्स गुरु डॉ. बी. एन. राव, जुनागढचे आमदार संजयभाई कोराणिया, जुनागढ चे पोलीस अधिक्षक हर्षद मेहता, इंजि.  सचिन ठाकरे, महापौर गीताबेन परमार, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्टचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे व्हाईस चेअरमन सुनील वानखेडे यांनी गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button