माईंड पार्लर आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान आयोजित सावित्रीमाई जन्मोत्सव साजरा

दर्शना पवार यांनी लिहिलेले ‘बदलत्या वयातील जाण व भान’ पुस्तकाचे प्रकाशन

 

अमळनेर (प्रतिनिधी) माईंड पार्लर व साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान आयोजित सावित्रीमाई जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याच वेळी दर्शना पवार यांनी लिहिलेले ‘बदलत्या वयातील जाण व भान’ हे पुस्तक डॉ. मयुरी जोशी व डॉ. लिना चौधरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. प्रा. डॉ कल्पना पाटील अध्यक्षस्थानी होते.

पुस्तक प्रकाशन वेळी डाॅ. मयूरी जोशी ( शिंदे  ) यांनी मुलींना वयात येतांना होणारे शारीरिक मानसिक बदल या विषयावर मार्गदर्शन केले. पुस्तक मुलींना भेट दिले. साधारण 200 मुली या कार्यशाळेसाठी उपस्थित होत्या.   प्रत्येक मुलीने हे पुस्तक आपल्या गावातल्या 10 स्रियांना वाचून दाखवावे, असे आवाहन केले. मुलींना निर्भय पणे शिक्षण घेता यावे. असे वातावरण आपण समाजात निर्माण केले पाहिजे असेही त्या बोलल्या.    डाॅ. लिना चौधरी यांनी आज 3 जाने सावित्री माईंचा जन्मदिवस त्यांना अभिवादन करून  साने गुरुजी स्मारक वतीने 3 ते 12 जानेवारी जिजाई ते सावित्री जन्मोत्सव साजरा केला जाईल. या दरम्यान स्मारकाच्या वतीने खान्देशात प्रबोधन कार्यक्रम होतील.  या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.  दर्शना पवार यांनी सावित्री माईंची  संघर्ष गाथा मुलींनी समजून घ्यावी.  मुलींनी शिकावे हाच आग्रह नेमका कशामुळे  होता. स्वातंत्र्य बरोबर जबाबदारी देखील येते. मुलींनी ताठ मानेने चालायला शिका, स्पष्ट बोला, अन्याय विरोधात बोला.  शिक्षणाचा आग्रह धरा, प्रामाणिकपणे शिक्षण घ्या. घाबरून जाऊ नका असे सांगितले. प्रा. रूचिता पाटील यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.धनश्री जाधव  यांनी आभार मानले. प्रताप महाविद्यालयच्या प्रा. डॉ वंदना भामरे यांनी कार्यक्रमचे सर्व नियोजन आयोजन केले.  दर्शना ताई पवार यांनी ही गुरूजनांचे , सहभागी मुलींचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *