अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी प्रथम पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन केले. विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. ऐ.माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षणाच्या प्रणेते, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडात वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना महाविद्यालयीन प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एम. के.वाघमारे यांनी केले. आभार प्रा. डॉ.डी.टी. कदम यांनी मानले.