शहरी शाळांमधील 10000 विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करून 2693 विद्यार्थ्यांना चष्मे केले वितरण

विप्रो कन्सुमर केअर व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यापासून घेण्यात आली शिबीरे

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील विप्रो कन्सुमर केअर व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यापासून शहरी शाळांमधील 10000 विद्यार्थ्यांचे  डोळे तपासणी करण्यात आली. त्यातील 2693 एवढ्या विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता भासली व अशा सर्व विद्यार्थ्यांना आधार व कडून चष्मे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात मुले सातत्याने मोबाईल, कम्प्युटर, डिजिटल स्क्रीन समोर असल्याने मुलाना दिसण्यास समस्या येत होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे अमळनेर शहरात शिक्षणासाठी येत असत. पण गरिबी परिस्थिती असल्यामुळे डोळे तपासता येत नाहीत, मजूर वर्ग असल्यामुळे डोळे तपासणी केली जात नाही किंवा शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यांच्या मुलांच्या वाचनावर व फळ्याकडे निरीक्षण करण्यावर परिणाम झाला. मुलांमध्ये शैक्षणिक रस कमी झाल्याने परिणामी शैक्षणिक नुकसान होणाऱ्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विप्रो कंजूमर केअर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे मागील वर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात शाळेत शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे दिले गेले. त्यांच्या अनेक गरजू ग्रामीण मुलांना फायदा झाला या शैक्षणिक वर्षापासून अमळनेर शहरातील 50 शिबिरांद्वारे शाळांमध्ये डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले.

ज्या विद्यार्थ्यांना डोळ्याच्या गंभीर समस्या आढळून आल्या त्यांना डॉक्टर राहुल मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी नेले गेले. या संपूर्ण अभियानासाठी अमळनेर विप्रोचे मॅनेजर विजय बाग जीवाला प्रोडक्शन मॅनेजर जे व्ही सर अकाउंट मॅनेजर अनंत निकम वेल्फेअर ऑफिसर सुधीर बडगुजर केमिकल मॅनेजर जितेंद्र शर्मा यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले डोळे तपासणी साठी अभिनव मुंदडा व पंकज पाटील यांचे सहकार्य लाभले, मुंदडा ऑप्टिकल्स चे राजू दादा मुंदडा यांनी अतिशय माफक दरात मुलांना चष्मे उपलब्ध करून दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद  यांनी सांगितले की भविष्यात देखील विप्रो कंपनी विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करेल. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आधार संस्थेचे निशिगंधा पाटील, अश्विनी भदाणे, दीप्ती गायकवाड, दीपक विश्वेश्वर, नंदिनी मराळे, यास्मिन शेख कल्पना सूर्यवंशी, तोसिफ शेख सुषमा वाघ ज्ञानेश्वरी पाटील तेजस पाटकरी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *