अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे व प्रश्नमंजूषा स्पर्धेतून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम,शिक्षक प्रतिनिधी ए.डी.भदाणे,ज्येष्ठ शिक्षक सी.एस.सोनजे,के.पी.पाटील,के.आर.बाविस्कर, यु.ए.हिरे, टी.एम.शेख व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी तसेच इंग्रजीतून सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती सांगितली. सावित्रीमाई यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले.यावेळी परिविक्षाधीन शिक्षिका यांनी” फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का” हे समूहगित सादर केले.उपशिक्षिका देवयानी भावसार तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या परिविक्षाधीन शिक्षिका सुनीता सूर्यवंशी, प्रियंका कौर, स्वाती साळुंखे, गौरव वानखेडे, आकाश बागडे, अकसा शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जे.बी.इंगळे यांनी केले. आभार टी.एम.शेख यांनी मानले.