खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

डांगरी येथे एकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २६ रोजी घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  डांगरी येथील जितेंद्र शांताराम शिसोदे (वय ४२) यांनी राहत्या घरी छताच्या लाकडी कड्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दुपारी दोन वाजता उघडकीस आले. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रशांत शिसोदे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button