अमळनेर तालुक्यात साकारणाऱ्या क्रीडा संकुलात लागणारे साहित्य यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा

जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात साकारणाऱ्या क्रीडा संकुलात लागणारे साहित्य यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जी. एस. हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमींची आढावा बैठक झाली. यावेळी रनिंग ट्रॅकला अल्युमिनियम इंनर , आधुनिक जिम, खो-खो,कबड्डीच्या इनडोअर मॅट ,ज्यूडो, कुस्ती मॅट असाव्यात यावर चर्चा करण्यात आली.

 राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या क्रीडा संकुलाच्या दोन कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होत आहे. त्यांनतर येणाऱ्या एक कोटीच्या निधीत  संकुलात कोणत्या सुविधा आणि यंत्रणा उपलब्ध असाव्यात याबाबत क्रीडा शिक्षक आणि क्रीडा प्रेमी याना विचारात घेऊन पुढील कामे करावीत, असे निर्देश दिले होते. तसेच क्रीडा विभागातर्फे काय अपेक्षित आहे याचा आढावा घेण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी , तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष सुनील वाघ , कार्यध्यक्ष संजय पाटील , प्रा. अमृत अग्रवाल, महेश माळी, रत्ना सोनवणे, जे. व्ही. बाविस्कर, एम.व्ही. पाटील, जयेश म्हासरे ,बी. एन. पाटील, पैलवान रावसाहेब पाटील ,पैलवान संजय पाटील, पैलवान बाळू पाटील उपस्थित होते. यावेळी रनिंग ट्रॅक ला अल्युमिनियम इंनर , आधुनिक जिम ,खो खो कबड्डी च्या इनडोअर मॅट ,ज्यूडो ,कुस्ती मॅट असाव्यात यावर चर्चा करण्यात आली.

 

जयेश धनगर व कृष्णा महाजन यांचा सत्कार

 

आढावा बैठक आटोपल्यावर ४९ व्या कुमार गट राज्य अजिंक्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या जीएस हायस्कूलच्या जयेश गुलाब धनगर व कृष्णा संजय महाजन यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बी. एस. पाटील , उपमुख्याध्यापक सी. एस. पाटील , एस. बी. निकम, ए.  डी. भदाणे , डी. एम. दाभाडे, एस. आर. शिंगाणे, के. पी. पाटील , सी. एस. सोनजे, एस. एम. पवार उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *