अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयात वर्धिष्णू संस्थेच्या आनंदघर प्रकल्पासाठी कॅम्पस मुलाखती

15 विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयात जळगाव येथील वर्धिष्णू या संस्थेच्या आनंदघर प्रकल्पासाठी कॅम्पस मुलाखती झाल्या. यात 15 विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलद्वारे आयोजन करण्यात आले होते.

 आनंदघर प्रकल्पाकरिता एमएसडब्ल्यू उमेदवाराची निवड करण्यासाठी वर्धिष्णु संस्थेकडून शख्याती मुमैया आणि अभिषेक यांनी महाविद्यालयातील एकूण 23 विद्यार्थ्यांचे मुलाखती घेतल्या. त्यापैकी 15 विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय वर्धिष्णुसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने अंमळनेर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने संस्था व महाविद्यालय यांच्यामध्ये एमओयु करण्यासंदर्भातही याप्रसंगी चर्चा झाली. या  उपक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. विजयकुमार वाघमारे, प्लेसमेंट सेल समन्वयक प्रा. डॉ. भरत खंडागळे यांनी पूढाकार घेतला. तर  प्रा. धनराज ढगे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. श्वेता वैद्य, प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा. डॉ. अस्मिता सर्वेय्या, प्रा. उदय महाजन, कार्यालय अधीक्षक श्री. अनिल वाणी, श्रीमती ज्योती सोणार व इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *