अमळनेर (प्रतिनिधी) येथील विशाल चौधरीचा जिल्हाधिकारींनी काढलेला एमपीडीएचा आदेश कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडपीठाने तो रद्दबातल ठरवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील भोई वाडा भागातील विशाल दशरथ चौधरी याच्यावर जिल्हाधिकारीच्या आदेशाने एमपीडीएची कारवाई करून त्याला पुणे येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. विशाल याच्यावर सहा गुन्हे असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले होते. विशाल याने ऍड सुधाकर महाजन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर युक्तिवाद करताना ऍड महाजन यांनी विशाल याचा अखेरचा गुन्हा आणि एमपीडीएचा आदेध यात सात महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी आहे. म्हणजे तो खतरनाक गुन्हेगार नाही, तसेच त्यांच्यावरील दोन गुन्ह्यांचा तपास सुरू आहे तर चार गुन्हे न्यायलयात प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारींनी एमपीडीएचे आदेश केल्यानन्तर तातडीने त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. परंतु या प्रकरणात आदेशानंतर आठ दिवसांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला.यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय नोर्णय व एमपीडीए कायदा कलम ३ (३) चे उल्लंघन झाले असा युक्तिवाद ऍड महाजन यांनी केला. त्यामुळे न्या.संजय देशमुख व न्या. आर.जी. अवचट यांनी जिल्हाधिकारीचा आदेश रद्दबातल ठरवला आहे. विशाल अंतरिम जामिनावर होता. त्याने पुन्हा कारागृहात हजर होण्याची गरज नाही असेही आदेशात नमूद करून स्थानबद्धतेचा आदेश रद्द केला आहे.