खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे “भारतीय भाषा उत्सव” विविध कार्यक्रमांनी साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस .ई.) येथे भारतीय भाषा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी काव्यात नवयुग निर्माण करणारे श्रेष्ठ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. विद्यार्थी – विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यानंतर इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी महाराष्ट्राती लावणी हा नृत्य प्रकार अगदी उत्कृष्टपणे सादर केले .त्यानंतर इयत्ता चौथीतील आराध्या दिसले या विद्यार्थिनीने संस्कृत मध्ये  राम रक्षा स्तोत्र म्हटले तसेच इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी राजस्थानी वेशभूषा धारण करून अगदी आकर्षक असे नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी ,गुजराती ,पंजाबी अशा भारतातील विविध भाषांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांना एकतेचा संदेश दिला. मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी भारतीय भाषा उत्सव का साजरा केला जातो ? यामागील पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका नयना बोरसे व शुभांगी पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button