खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मित्राला भेटून येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेला अमळगांव येथील २५ वर्षीय तरुण झाला बेपत्ता

अमळनेर (प्रतिनिधी) मित्राला भेटून येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेला २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील अमळगाव येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेली याबाबत अधिक माहिती अशी की, अमळगाव येथील प्रमोद सुरेश चौधरी (वय २५) हा दिनांक ६ रोजी रात्री ८ वाजता मित्राला भेटून येतो, असे सांगून घरातून निघाला. मात्र रात्री तो घरी परतला नाही आणि सकाळी मित्र आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर आजपावेतो तो घरी परत न आल्याने सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button