महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील दुकानदारांना मराठीत फलक लावण्याचे आदेश देण्यात यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी भाषेत फलक लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देण्यात आले आहेत. तरीपण अमळनेर शहरातील काही दुकानदारांच्या फलकावर इंग्रजी अक्षरात नाव लिहिलेली होती. या दुकानदारांना नोटीस देऊन त्यांना मराठीत फलक लावा असे सांगावे. अन्यथा दुकानदार सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करत नाही म्हणून आपण त्या दुकानदारांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल. निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष करण पाटील, शहर सचिव संकेत पाटील, शहर उपाध्यक्ष गजानन गोसावी, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष हर्षल पाटील, आदित्य पगारे, विद्यार्थी सेनेचे राहुल शेलार, गट अध्यक्ष श्यामकांत बडगुजर, संदीप पाटील, योगेश पाटील, दिनेश पवार, प्रोमोद पाटील, आकाश पाटील, रुपेश पाटील व मनसे सैनिक उपस्थित होते.