अमळनेर ग्रामीण हिरालाल शांताराम पाटील यांची तर अमळनेर शहर विजयसिंह पंडित राजपूत यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) भाजपच्या जळगाव पश्चिम जिल्ह्याचे युवा मोर्चा व मंडळ नूतन अध्यक्षाची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी जाहीर केले आहे. यात अमळनेर ग्रामीण हिरालाल शांताराम पाटील यांची तर अमळनेर शहर विजयसिंह पंडित राजपूत यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी जाहीर केले आहे जिल्ह्याचे युवा मोर्चा व मंडळ नूतन अध्यक्ष यांची निवड केली.
निवड करण्यात आलेली कार्यकारिणी
चाळीसगाव ग्रामीण सुनील राजधर निकम, चाळीसगाव शहर नितीन रमेश पाटील, भडगाव सोमनाथ शालिग्राम पाटील, पाचोरा ग्रामीण अमोल पंडितराव शिंदे, पाचोरा शहर दीपक पांडुरंग माने, धरणगाव जिजबराव गिरधर पाटील जळगाव ग्रामीण हर्षल प्रल्हाद चौधरी पारोळा अनिल गुलाब पाटील एरंडोल राजेंद्र विठ्ठल पाटील अमळनेर हिरालाल शांताराम पाटील अमळनेर शहर विजयसिंह पंडित राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.