विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्या वतीने ‘संविधान साक्षरता सायकल रॅलीचे” केले स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव महराष्ट्र ते दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून संविधानाविषयी जागृती निर्माण करणाऱ्या मुकेश कुरील यांचा विद्रोही साहित्य संमेलन समितीच्यावतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला.

मुकेश कुरील यांनी बळीराजाच्या प्रतिमेला वंदन करून  संविधान व फुले-शाहू- आंबेडकर यांच्या नावाने घोषणा दिल्यात.तर उपस्थित कार्यकर्त्यांनी संविधान साक्षरता यात्रे साठी शुभेच्छा देत मुकेश कुरील यांचा उत्साह वृद्धिंगत केला. शिक्षणाने व व्यवसायाने वकील असलेल्या मुकेश कुरील यांनी सर्वसामान्य जनतेत भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून दिल्लीपर्यंतचा प्रवास सायकलीने करून संपूर्ण प्रवास मार्गावर ही जागृती करणार असल्याचे उपस्थिताना सांगितले. राष्ट्रपती भवनापासून ते प्रत्येक सरकारी कार्यालयाबाहेर संविधानाची प्रतिकृती लावली पाहिजे असे सांगून संविधान ज्या विचारांवर आधारित आहे .त्याचा जागर ३ व ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात होणार असल्याने सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहनही ठीकठीकानी करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा.डॉ. लीलाधर पाटील यांनी सुरुवातीला मुकेश कुरील यांचा परिचय करून देत भारतीय लोकशाही ज्या स्वातंत्र्य समता बंधुता व सामाजिक न्याय या पायांवर उभी आहे, त्या मूल्यांची रुजवण व्हावी म्हणून निघालेल्या संविधान साक्षरता रॅलीला 18 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संयोजन समितीचे सदस्य अशोक बिऱ्हाडे, माजी नगरसेवक श्याम पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, बापूराव ठाकरे, डॉ. राहुल निकम, डॉ. रवींद्र माळी, प्रा. विजय वाघमारे, धीरज चव्हाण, आर. बी. पाटील, महेश पाटील, अजय भामरे, सोपान भवरे, संदीप सैंदाणे आदिंसह कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *