मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून स्वातंत्र्या नंतर प्रथमच अमळनेर मतदारसंघात रस्त्यांना मंजुरी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील आमदार तथा राज्याचे मदत व पूर्नवसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून स्वातंत्र्या नंतर प्रथमच अमळनेर मतदारसंघातील 50 गावांना शेतशिवार रस्त्यांना मंजूरी मिळाली आहे. सुमारे 10 कोटी निधीतून हे शेतरस्ते होणार आहेत. शेतकऱ्यांचा शेतशिवाराचा मार्ग सुकर होणार आहे. ग्राम विकास व पंचायत राज विभाग तसेच स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून हे रस्ते होणार आहेत. पहिल्या टप्प्यात अमळनेर मतदारसंघातील तब्बल 50 गांवाचा यात समावेश केला असून पुढील टप्प्यात उर्वरीत गावांना देखील शेतरस्ते मंजूर केले जातील अशी माहिती नामदार अनिल पाटील यांनी दिली आहे.दहा कोटी निधीतून सदर 50 गावांतील रस्त्यांची कामे होणार आहेत. सदर मंजूरी बद्दल ना.अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ग्राम विकास मंत्री ना.गिरीष महाजन व जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. तर शेतीसाठी आवश्यक असलेला रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांनीही ना. अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
खालील गावातील शेतशिवारात होणार रस्ते
सदर 10 कोटी निधीतून खालील 50 गावांमध्ये गावाकडून शेताकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण होणार असून यासाठी प्रत्येक गावात 20 लाख रू. खर्च होणार आहेत. मौजे. हिंगोणे खु.प्रज, जानवे, पातोंडा, शिरूड, गांधली, वावडे हेडावे, चौबारी, मांडळ, कळंबू, तामसवाडी, अंतुर्ली, आमोदे, तासखेडा, निंभोरा, जळोद, नगाव खु., गडखांब, कंडारी, खेडी, टाकरखेडा, तरवाडे, खेडी प्रज, बोदर्ड, पळासदडे, पिंपळकोठा, जिराळी, इंधवे, रत्नापिंप्री, भोलाणे, वंजारी, दगडी सबगव्हाण, नगाव बु., निंब, रामेश्वर, वाघोदे, फाफोरे, सारबेटे, कुऱ्हे बु., आर्डी, अमळगांव, वसंतनगर, हिंगोणे खु.प्रअ, चिखलोद खु., गलवाडे बु., सावखेडा, निमझरी, नालखेडा, मंगरूळ, दापोरी इ. गावांचा समावेश आहे.