अमळनेर (प्रतिनिधी ) येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे लायन्स क्लब आंतरराष्ट्रीय शांतता पोस्टर स्पर्धा झाली. 3 दशकाहून अधिक काळापासून जगभरातील ‘लायन्स क्लब’ शाळा आणि युवा गटांमध्ये हे अतिशय उत्कृष्ट असे कला स्पर्धेचे आयोजन करीत असते. स्वप्न पाहण्याची हिंमत करा, या उद्दिष्टाने स्वप्न म्हणजे फक्त एक इच्छा किंवा आशा नसून तो एक मार्ग ,एक ध्येय ,एक महत्वकांक्षा आहे हेच या स्पर्धे मागील मुख्य हेतू होता. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भरभरून सहभाग घेतला. तसेच डी .आर. कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी देखील सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा 11,12,13 या वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती .त्यावेळी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी सारा युसुफ करू हिला (प्रथम) ,डी .आर. कन्या शाळेचे विद्यार्थिनी मानसी रमाकांत सैंदाणे (द्वितीय) , स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी कीशा जयेश चौधरी (तृतीय) व डी .आर. कन्या शाळेची विद्यार्थिनी रिया हेमंत कुमार बडगुजर यांनी (चतुर्थ) क्रमांकाचे बक्षीस मिळविले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस खाली विद्यार्थ्यांना देण्यात आले. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील देवयानी शरद पाटील ,निशा विलास पाटील, हर्षदा पाटील ,सृष्टी जगताप, मानसी पाटील, जानवी सुनील पाटील, देवयानी पाटील व डी. आर. कन्या हायस्कूल येथील नेहा संजय कुमार ,आसमा पिंजारी, गार्गी सुनील जोशी, सेजल नितेश कुमार बडगुजर या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे, उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर ,कलाशिक्षिका हर्षा मॅडम यांनी विजयी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.