अमळनेर (प्रतिनिधी) आधार बहुउउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लबतर्फे तालुक्यातील ३५ एचआयव्ही ग्रस्त बालकांना फराळ, कपडे ,पोषक धान्य किट आणि प्रोटिन्स देऊन त्यांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण केला. यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अमळनेर तालुक्यात १८ वर्षाखालील एचआयव्ही ग्रस्त बालक ३५ असून त्यातील १७ बालकांना आई वडील नाहीत तर उर्वरित बालक हे एकल पालक असलेले आहेत. या मुलांच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना त्यांच्या मदतीला आधार संस्था आणि रोटरी क्लब धावले असून ऐन दिवाळीत या मुलांना फराळ आणि कपडे देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान करून त्यांच्यात दिवाळीचा गोडवा भरला आहे. स्वादिष्ट नमकीन चे निलेश पाटील ,जळगाव येथील टी डब्ल्यू जे मिलिंद पाटील , सनहिल्स सोलर टेक्नॉलॉजीचे हितेश पाटील ,मनोज पाटील , मकसुद बोहरी ,मेहराज बोहरी यांनी कपडे ,फराळ ,धान्य किट ,प्रोटिन्स साठी आर्थिक मदत केली. प्रमुख अतिथी पत्रकार संजय पाटील , खबरीलाल संपादक जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते मुलांना किट वाटप करण्यात आले. यावेळी संजय पाटील म्हणाले की आपण प्रत्येक जण समाजाचे देणे लागतो , समाजातील वंचित घटक ,दुर्बल ,गरीब घटकांना मदत करून त्यांना समाजाच्या प्रवाहसोबत आणणे हीच खरी समाजसेवा आधार आणि रोटरी करीत आहेत. यावेळी आधार च्या अध्यक्षा डॉ भारती पाटील , रोटरी अध्यक्ष प्रतीक जैन यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अभिजित भांडारकर यांनी केले.रोटरी क्लबचे राजेश जैन, विजय पाटील ,ईश्वर सैनानी ,पूनम कोचर, रोहित सिंघवी, महेश पाटील, ताहा बुकवाला ,आशिष चौधरी , किर्तीकुमार कोठारी , आधार च्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद , संजय कापडे, दीपक विश्वेश्वर, पूनम पाटील, तेजस पाटकरी , मुरलीधर बिरारी , निशिगंधा पाटील , सुषमा विसपुते यांनी निराधार मुलांच्या जीवनात आनंद भरण्यासाठी सहकार्य केले.