दहा आरोपीतांवर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करून २,६२.५७५ रुपयांचा मुद्देमाला केला जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी अमळनेर शहरात तसेच जानवे व गडखांब शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हात भट्टीवर छापा टाकुन दहा अरोपीतांवर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल केले. यात २,६२.५७५ रुपयांचा मुद्देमाला जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गावठी हात भट्टी दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबाचे संसार उदध्वस्त होतात म्हणनुच अवैध गावठी हात भट्टी दारुवर कठोर प्रतिबंधक कारवाईच्या अभियान अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हाती घेतले असून त्याची सुरुवात करण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वता समक्ष व त्यांच्या पथकाने अमळनेर शहरात तसेच जानवे व गडखांब शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी गैरकायदा गावठी हात भट्टीवर छापा टाकुन दारुबंदी सदराखाली कारवाई केली आहे. या कारवाईत दहा अरोपीतांवर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले असुन दाखल सहा गुन्ह्यांत १,३५,००० रुपये कि. च्या तीन मोटर सायकल,१७,७०० रुपये कि.ची १७७ लिटर गावठी हात भट्टी तयार दारु, १,०९८७५ रुपये कि. चे १४६५ लिटर गावठी हात भट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन असा एकूण २,६२.५७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दारू व रसायने जागीच नाश करण्यात आला असुन दाखल गुन्ह्यांचा तपास चालू आहे तसेच यापुढे देखील असेच मोठ्या कारवाई करण्याचे अभियान सतत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. ही कारवाई त्यांच्यासह सपोनि हरीदास बोचरे, पोउनि विकास शिरोळे, पोहवा संदेश पाटील, पोहवा सुनिल जाधव, पोहवा विजय भोई, पोहवा कैलास शिंदे, पोहवा हितेश चिंचोरे, पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील, पोना जयंत सपकाळे, पोकों भुषण पाटील, पोकों योगेश बागुल, मपोकाँ नम्रता जरे, मपोका मोनिका पाटील यांच्या पथकाने केली आहे.