खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

आरक्षणासाठी अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखा तून कुणबी नोंदीचा शोध घेणे सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखा तून कुणबी नोंदीचा शोध घेणे सुरू झाले आहे, याबाबत अधिक माहिती अशी की,मराठा समाजाला आरक्षण मिळणेसाठी कुणबी नोंदी शोधणे बाबत शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्याने अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखा तून कुणबी नोंदीचा शोध घेणे सुरू झाले आहे, यासाठी तलाठी आणि कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे,सदर नोंदी 7 ते 9 नोव्हेबर दरम्यान शोधून विवरण पत्रात भरून शासनाकडे सादर करायचे आहेत. दरम्यान अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखात सर्वच ठिकाणी कुणबी नोंदी आढळत असल्याचे प्रशांत एस. धमके यांनी सांगितले, कुणबी नोंदी शोधण्यासाठी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी संदीप शिंदे,अमोल सोनवणे,प्रकाश महाजन भुपेश पाटील,बळीराम काळे,प्रदीप भदाणे यांच्या सह कोतवाल राजेंद्र मोरे,घनश्याम पाटील,उमेश पाटील, श्रीमती वैशाली पाटील,गायत्री साळवे, सागर पाटील मदत करत आहेत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button