खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक व उत्कृष्ट गणपती बाप्पा स्पर्धेत निरंजन बडगुजर प्रथम

रोटरी क्लबतर्फे केले होते स्पर्धेचे आयोजन

 

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लबतर्फे झालेल्या पर्यावरणपूरक व उत्कृष्ट गणपती बाप्पा स्पर्धेत  एलआयसी कॉलनीतील निरंजन निर्मल बडगुजर याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. त्याचे कौतुक केले जात आहे. अमळनेर शहरात पर्यावरण पूरक गणपती, आरास, कमी खर्चात उत्कृष्ट सजावट यासाठी रोटरी क्लबने बक्षीस ठेवले होते. विविध तज्ञ प्रशिक्षकांकडून परीक्षण करून बक्षीस देण्यात आले.  स्पर्धकांना गणपती बाप्पा सोबत फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते.  यात प्रथम  निरंजन निर्मल बडगुजर द्वितीय हिरल आनंद महाजन तृतीय कुणाल राहुल चौधरी व  रोहन अहिराव विभागून तर उत्तेजनार्थ कस्तुरी अजय रोडगे, चेरी सौरभ जैन, कनिशिका महेश पाटील, तुषार नरेंद्र सैनानी यांनी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रतीक जैन सचिव देवेंद्र कोठारी, प्रोजेक्ट चेअरमन महेश पाटील व रोटरीचे सर्व सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button