खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

वृत्तपत्र वाटप, विक्रेत्यांच्या स्वागताने वाचन प्रेरणा दिवस केला साजरा

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल राबवला आगळावेगळा उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून वाचन प्रेरणा दिवस व वृत्तपत्र वाटप / विक्रेता यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना भेट वस्तूही देण्यात आली. यामुळे ते चांगलेच भारावले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या सदस्या शितिका अग्रवाल होत्या. मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे, उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर, अमळनेर शहरातील वृत्तपत्रे वाटप / विक्रेते, प्राथमिक – माध्यमिक विभागातील शिक्षकांनी मिसाइल मॅन डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण केली.  त्यानंतर उपस्थित सर्व वृत्तपत्र वाटप / विक्रेता यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय समितीच्या सदस्या शितिका अग्रवाल यांनीही वृत्तपत्र वाटप विक्रेता यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक – उपमुख्याध्यापक यांनीही वृत्तपत्र वाटप विक्रेता यांचे कार्य समाजात “खारीचा वाटा” नसून “सिंहाचा वाटा” म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे व्याख्यानातून स्पष्ट केले . तसेच काही वृत्तपत्र वाटप विक्रेते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आम्हा  लोकांचे स्वागत करणारी ही पहिली शाळा आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर शिक्षिका प्रतिभा पाटील, अश्विनी पाटील, यशस्वी चौधरी यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे यांनी अवकाश क्षेत्रातील अब्दुल कलामांचे योगदान याविषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांची महती वर्णन केली. सूत्रसंचालन राहुल पाटील व प्रशांत कापडणे यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button