खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप महाविद्यालयाच्या केंद्रात मुक्त विद्यापीठातर्फे एम. ए. इतिहास अभ्यासक्रमास मान्यता

अमळनेर (प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे प्रताप महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रात शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून एम. ए. इतिहास (M60) हा कोर्स सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

या वर्गाचे ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले आहेत, प्रवेश पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असणारे अध्ययनार्थी इतिहास विषयातील पदव्युत्तर पदवी एम.ए. इतिहास प्रथम वर्षास प्रवेश मिळण्यासाठी पात्र असतील. तसेच बी. ए. / बी. कॉम ( मराठी व इंग्रजी मध्यम) / एम.ए. भाग 1 / 2  ( मराठी हिंदी ) (इंग्रजी फक्त भाग 2) / एम.बी.ए. भाग 2 / एम.सी.ए. भाग 2 / बी. लिब / डिप्लोमा इन जर्नलिजम / डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक या वर्गाचे ही प्रवेश सुरू आहेत. प्रवेशाची अंतिम मुदत दि. 30/09/2023 पर्यंत आहे. तसेच एम.बी.ए. भाग 1 एंट्रन्सची मुदत 28/09/2023 पावेतो आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ.ए.बी.जैन व केंद्र संयोजक प्रा.पराग पाटील यांनी केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button