खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

तरुण प्रमित गोहील ठरताय महामेरू, शेअर मार्केट, इन्व्हेसमेंटचा महागुरू

नागरिकांना सोप्या, साध्या आणि सरळ भाषेत करताय मार्गदर्शन

 

अमळनेर (प्रतिनिधी) आपल्या घामाचा आणि कष्टाचा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवल्यास त्याचे रिटर्नस चांगले मिळावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. यासाठी आर्थिक सल्लागार चांगला मिळाला तर गुंतवलेल्या पैशाचा मोबदलाही चांगला मिळते. पण असे चांगले आर्थिक सल्लागार मिळणे दुरापास्त असते. त्यातल्या त्यात शेअर मार्केटविषयी सर्वसमान्यांचे अनेक समज आणि गैरसमज असल्याने त्याकडे बुतांश जण अजूनही वळत नाही. परंतु अमळनेर सारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणी प्रमित जगदीश गोहील हे शेअर मार्केट आणि अन्य इन्व्हेशमेंट संदर्भात नागरिकांना सोप्या, साध्या आणि सरळ भाषेत मार्गदर्शन करीत असल्याने आज या तरुण आर्थिक सल्लागाराकडे लोकांचा ओढा वाढू लागला आहे. सर्वसमान्य नागरिक आणि शेअर मार्केट यांचा दुरदूरपर्यंत काहीच संबंध नसतो. परंतु सद्या सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमुळे शेअर मार्केट हा घटक प्रत्येक घराघरापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे प्रत्येकाल या मार्केटविषयी उत्सुकता असते. त्याविषीय सविस्तर जाणून घ्यायचे असते. परंतु सोप्या, साध्या आणि सरळ भाषेत या मार्केटविषयी पुरेशी माहिती मिळत नसल्याने अनेकांची निराशा होते. परंतु अमळनेर येथील प्रमित गोहील यांच्या संपर्कात येणाऱ्याला या मार्केटविषयी सविस्तर आणि चांगली माहिती विशेषतः चांगला आर्थिक सल्ला मिळत असल्याने लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. आज प्रमित जगदीश गोहिल यांचा वाढदिवस आहे. ४२ व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे. आज सर्वत्र गणरायाचे आगमन होत असल्याने या शुभ दिनीच प्रमित यांचा वाढदिवस असल्याने खबरीलालने त्यांचे करिअर आणि शेअर मार्केट इन्व्हेशनमेंट संदर्भात जाणून घेतले.  प्रमित यांच्याकडे आजमितीस ३५० वर नागरिकांनी शेअर मार्केटसह अन्य ठिकाणी गुंतवणूक गुंतवणूक केली आहे. योग्य सल्ला. मार्केटचा चांगला अभ्यास असल्याने त्यांच्याकडे ग्राहक म्हणून असलेला प्रत्येक नागरिक आज समाधानी आहे. या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड असल्याने प्रमित हे सचोटी आणि प्रामाणिकपणे पारदर्शीपणे काम करीत असल्याने त्यांच्याकडे अमळनेर शहर, तालुकाच नव्हे तर दिल्ली, मुंबई, सुरत अहमदाबाद, नागपूर पुणे येथीलही क्लायंट आहेत. योग्य मार्गदर्श आणि मिळणारा परतावा हीच ग्राहकांसाठी त्यांची जमेची बाजू आहे.

 

स्वकर्तृत्वाने उभारले साम्राज्य

 

प्रमित हे गेल्या १४ वर्षापासून शेअर मार्केट आणि इन्व्हेसमेंट क्षेत्रात काम करीत आहे. ब्रोकर म्हणून घरात असा कोणताच वारसा नव्हता. केवळ वडिलांनी शेअर घेतले होते. त्यातून धडा घेत या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि आज या क्षेत्रात आपला स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. शेअर मार्केटमध्ये उतरण्यासाठी त्यांना राकेश झुणझुनवाला, संजीव भसीन यांच्याकडून प्रेरणा मिळाली तर इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये शेअर मार्केट आणि इन्व्हेसमेंट संदर्भात लिहणाऱ्या अर्थतज्त्रांच्या लेखातून गाइडलाइन मिळत गेल्या त्याआधारे आज स्वतःचा एक चांगला अभ्यास झाला आहे. त्यातून त्यांनी आयआयएफएल सिक्युरिटीज लि स्थापन केली आहे. याच्या माध्यमातून ते लोकांना प्रॉपर गाईडन्स करतात, लोकांनी गुंतवलेल्या पैशांवर नफा अधिक कसा मिळेल, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. अमळनेरात साधरणातः पाच ब्रोकर आहे. त्यात प्रमित हे सर्वात टॉपर तरुण आहे.

 

भविष्याचा वेध घेत करावी गुंतवणूक

 

शेअर मार्केटविषयी लोकांमध्ये गैरसमज असतो. परंतु आपण स्वतःचे आपल्या भोवतालचे निरीक्षण केले पाहिजे. आपण घरात रंग लावतो, जसे एसिएन पेंट, सर्वाज जास्त चालतो बर्गर पाइँट, लोखंटमध्ये टाटा स्टिल, सिमेंट मध्ये अलर्टाटच, अंबुजा, एसीसी, टायरमध्ये सीईएट, अपोला, बालक्रिष्णा आयएनएसडी, जेके टायर हे आज आवश्यक आहे. त्यात या कंपन्यांचे मार्केट आहे. इन्वेसमेंटसाठी मार्केट नेहमीच चांगले आहे. जे डोळ्यासमोर दिसते. उदा, ब्रिटानीया बिस्कीट, ताज हॉटेल, निलकमल फर्निचर आदीत गुंतवणूक करणे फायदेशीर असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा बुडणार नाही, यासाठी भविष्याचा वेध घेत इलेक्ट्रीक व्हेयकल, सोलर हायड्रो आणि विंड पावरमध्ये गुंतवणूक चांगली आहे, असा सल्लाही प्रमित जगदीश गोहिल देतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button