खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शहरातील पारोळा रस्त्यालगत असलेल्या शेतात डुकरे मका पिकांचे करताय नुकसान

कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याबाबत शेतकऱ्याने दिले तहसीलदारांना निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पारोळा रस्त्यालगत असलेल्या शेतात डुकरांनी हैदोस घातला असून रोज मका पिकाचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्याने तहसीलदार, व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन या डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.
शेतकऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सत्येन संदानशिव यांची पारोळा रस्त्यालगत शेती असून त्यात मका पिकाची लागवड केली आहे. मात्र या भागात डुकरे सतत शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत असतात. गेल्या आठवड्यापासून मका पिकाचे रोजच नुकसान होत असल्याने सदर नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा व या डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्याने निवेदनाद्वारे केली आहे. सततच्या ह्या नुकसानीमुळे कंटाळलो असून याबाबत काही कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे. पिंपळे रोड शिवकॉलनी, झामी चौक इस्लामपूरा , शाहआलम नगर ह्या भागात ही डुकरांच्या त्रास आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button