खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर फिरवून विनयभंग, दोघांना अटक

अमळनेर (प्रतिनिधी) १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर फिरवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सारबेट्याच्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पळासदळे येथील१३ वर्षीय शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला सारबेटा येथील भुऱ्या व साहिल यांनी ओळखीचा फायदा घेत ९ रोजी सकाळी११ वाजेच्या दरम्यान बसस्थानकावरून मोटरसायकल वर बसवून तिला फिरवण्याच्या उद्देशाने धार येथील टेकडीवर नेऊन तिचा जबरदस्तीने विनयभंग केला. मुलीच्या फिर्यादीवरून साहिल (पूर्ण नाव माहीत नाही),भुऱ्या (पूर्ण नाव माहीत नाही ) या दोघांविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button