अमळनेर (प्रतिनिधी) जालना येथील मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी अमळनेर तालुका सकल मराठा समाजातर्फे ६ रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमळनेर शहरातील मराठा मंगल कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार असून तहसील कार्यालयावर मोर्चा धडाडणार आहे. लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा निघणार असून यात शासनाच्या हुकूमशाही व जुलमी राजवटीचा निषेध केला जाणार आहे. समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.