अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील वावडे येथील बी. बी. ठाकरे हायस्कूलमध्ये मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शन झाले.
मिल के चलो असोसिएशनचा चौथा वर्धापन दिन ९ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने अमळनेर तालुक्यातील काही ठराविक शाळांमध्ये विज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. संस्थेतर्फे त्याची सुरुवात वावडे येथून करण्यात आली. या प्रत्येक शाळेत पुढील आठवड्यात विज्ञान प्रदर्शन घेतले जातील आणि यात निवडलेले विद्यार्थी अमळनेर येथील कार्यक्रमाच्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतील. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक साहेबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुचसंचलन प्रल्हाद पाटील यांनी केले. विज्ञान प्रकल्पांचे परिक्षण निरंजन पेंढारे यांनी केले. माजी विद्यार्थी पोलिस कॉन्स्टेबल दिपक पाटील, प्रतिष्ठित शेतकरी चंद्रकांत पाटील, पालक प्रतिनिधी दिनकर पाटील उपस्थित होते. मंचावर मिल के चलो चे पदाधिकारी इंजिनीयर अनिरुद्ध पाटील, इजि. कल्याणी पाटील, सदस्य करुणा पाटील, इंजि. विनायक पाटील उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन मिल के चलो संस्थेचे सहकारी चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे, प्रिया ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने उत्कृष्ठ रित्या केले होते.
लगेच शैक्षणिक साहित्याचे बक्षिस वाटप
विज्ञान प्रदर्शनात ३५ विज्ञान प्रयोग प्रतिकृती, २५ पोस्टर आणि २० विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला. एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या कामात नाविन्यता तसेच अभ्यासूपणा स्पष्टपणे दिसून आला. परिक्षणानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांना लगेच शैक्षणिक साहित्याचे बक्षिस वाटप करण्यात आले.