मुलींचा संघही ठरला उपविजयी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा १४ वर्षाखालील गटात मुलांचा संघ विजयी झाला तर मुलींचा संघ उपविजयी ठरला आहे. त्यांच्या विजयाचे स्वागत केले जात आहे.
प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विजय झालेल्या संघात संघात वंदन अग्रवाल, अर्णव पाटील, सार्थक पाटील, निमित्त साळुंखे, आरव अग्रवाल यांची जळगाव जिल्हास्तर शालेय बॅडमिंटन स्पर्धेत निवड झालेली आहे तर मुलींचा उपविजेयी झालेल्या संघात मानसी पाटील, साराह करू, तेजस्विनी दाभाडे, यांनी चांगली कडवी झुंज दिली, पण त्यांना उपविजेयी वर समाधान मानावे लागले. यशस्वी झालेल्या बॅडमिंटन संघ लवकरच जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. यावेळी क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर व योगेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे, उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विजयी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.