अमळनेर तालुक्यात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेने साधला संवाद

ठिकठिकाणी सभा घेऊन मार्गदर्शन, ग्रामस्थांकडून यात्रेस मिळाला प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा जनसंवाद यात्रेचे अमळनेर तालुक्यात सावखेडा येथे आगमन झाले. त्यात जनसंवाद यात्रेसाठी एक रथ तयार केला होता. यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
रथाच्या तिन्ही बाजूला राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे, उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, बाळासाहेब प्रदीप पवार, संदीप भैय्या, यांचे फोटो असलेले बॅनर लावले होते. रथाच्या आधी तालुक्यातील 40 मोटरसायकलीना काँग्रेस पक्षाचा झेंडा लावून रॅली होती. सावखेडा, मुंगसे, रुंदाटी फाटा, मडगव्हाण, पातोंडा, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव, गांधली मार्गे अमळनेर येथे फरशी रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पाचकंदील, सुभाष चौक, साने गुरुजी पुतळा पासून, नाट्यगृहाच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे आयोजन होते. त्यात जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील,माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब संदीप जी पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष डी.डी. नाना पाटील, महाराष्ट्र राज्य एन एस उयु वाय चिटणीस धनंजय चौधरी, एन एस यु आय जिल्हाध्यक्ष भूपेश जाधव, स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष सेल देविदास ठाकरे. या बाहेरील पदाधिकाऱ्यांसोबत, अंमळनेर येथील बऱ्याच राजकारणाची उपस्थिती होती. सावखेडा येथे ग्रामपंचायत मंदिरात सभा झाली. सभेचे आयोजन बाळू कदम यांनी केले. सावखेडा येथील श्री धुडकू तिलकचंद पाटील यांनी सर्वप्रथम विचार मांडले. संदीप घोरपडे यांनी प्रास्तावित केले. योगेंद्रसिंग पाटील आणि बाळासाहेब पवार यांनी विचार मांडले. मुंगसे, रुंदाटी मार्गे मडगव्हाण येथे, गावाबाहेरील मंदिरात सभेचे आयोजन येथील महेश आसाराम पाटील यांनी केले होते. तेथे बी. के. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी विचार मांडले. पातोंड येथे, ग्रामपंचायत समोरील चौकात सुनील नाना पाटील व अमित यांनी सभेचे आयोजन केले होते. पातुंडा येथील सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांची विशेष उपस्थिती होती. खवशी येथे ग्रामपंचायत प्रांगणात बी.के. सूर्यवंशी व ज्ञानेश्वर कोळी ज्ञानी यांनी सभेचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन कैलास पाटील यांनी केले. प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले. खेडी प्र. जळोद येथे प्रा. शाम पवार यांनी ग्रामपंचायत मंदिरासमोर सभेचे आयोजन केले होते. योगेंद्र सिंह पाटील यांनी आदेश पूर्ण भाषण केले. आमलगाव मार्गे, शेवटच्या सभेचे आयोजन गजेंद्र साळुंखे यांनी गांधी येथे केले होते. अमळनेर शहरात राजू संधानशिव व राजू चंडाले यांनी सत्काराचा कार्यक्रम केला. सूत्रसंचालन अॅड. शेख यांनी केले. नाट्यगृहात नूतन अमळनेर महिला शहराध्यक्ष प्रा. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे औक्षण केले.

दुसऱ्या दिवशी असे झाले कार्यक्रम

दि. ४ रोजी जनसंवाद यात्रा मालपूर येथे श्री गुलाब जयदेव पाटील यांनी, आयोजित केलेल्या सभेत हजर झाली. तेथे मनोज पाटील यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.प्रदीप पवारांनी मालपुर येथील तरुणांना बोलते केले. धार मार्गे मारवड येथे माजी जि. प. सदस्य शांताराम शामराव पाटील यांनी सभेचे आयोजन केले होते. कळमसरे येथे मगन भाऊसाहेब व तुकाराम चौधरी यांनी गावच्या काँग्रेस शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते केले. मगन भाऊसाहेब यांनी प्रास्ताविक केले. निम शाखाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचा सत्कार केला. त्यानंतर जनसंवाद यात्रा अमळनेर टाकरखेडा कंडारी मसले मार्गे धरणगाव तालुक्यात मार्गस्थ झाली.
तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा ओबीसी अध्यक्ष डीडी पाटील, खाशी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे, धनगर पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश पीरण पाटील, तुकाराम चौधरी, अमळनेर मार्केट कमिटीचे संचालक प्रा. सुभाष पाटील,माजी जी.प.सदस्य शांताराम पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई वाघ, युवक तालुका अध्यक्ष महेश पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तुषार संदंशिव, गिरीश पाटील, राजू भट, संदीप घोरपडे, प्रा.श्याम पवार, श्रीराम पाटील, नगरसेवक राजू संदानशिव,राजू चांडाले, रोहिदास सुखा पाटील, संभाजीराव बापू, गजेंद्र साळुंखे, जयवंत पाटील, प्रवीण जैन, भागवत गुरुजी डबीर भाई पठाण, जितेंद्र चौधरी, रज्जाक शेख, रामलाल चौधरी, संदीप घोरपडे, प्रवीण जैन, विवेक पाटील, मयूर पाटील, भागवत गुरुजी , जितेंद्र चौधरी, डबिभाई पठाण, मगन भाऊसाहेब, तुकाराम चौधरी, श्याम पवार,बी.के. सूर्यवंशी, मुन्ना शर्मा, प्रताप आबा, तौसीब तेली, कुणाल चौधरी, रौफ पठाण यांनी सहाकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *