अमळनेर (प्रतिनिधी) श्रावण सोमवार निमित्ताने येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर लक्ष्मीनगर संस्थानतर्फे यंदा पहिल्यांदा कपिलेश्वर ते अमळनेर पायी कावड यात्रा काढण्यात आली. यास भाविकांचा प्रतिसाद मिळाला.
जय भोले च्या जय गजरात कपिलेश्वर ते अमळनेर कावड यात्रा काढण्यात आली. या वर्षांपासून प्रथमच श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे लक्ष्मीनगर कावड यात्रा सुरू करण्यात आली आहे. यंदा २५ शिवभक्त कावड यात्रेत सहभागी झाले. प्रारंभी सर्व शिवभक्तांनी कपिलेश्वर महादेव मंदिर येथे तापी नदीवर जाऊन विधिवत पूजा करून कावडीत तापी मातेचे पवित्र जल भरून कावड यात्रेत सुरुवात झाली. नीम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी शिवभक्तांचे स्वागत केले. श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर तापी नदीच्या जल महादेव मंदिरात पूजनाने अभिषेक करण्यात आला. शांतीलाल पाटील, दिलीप पाटील, धनराज चौधरी, घनश्याम पाटील, रवींद्र मुसळे, चंद्रकांत पाटकरी, सखाराम पाटील, गुलाबराव पाटील, वाय एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा काढण्यात आली. यात्रेत विशाल सोनार, जयेश अहिरराव, जयेश कासार, निखिल जळोदकर, चेतन कासार, रोहित चौधरी, अलका चौधरी, नलिनी बाविस्कर, आशाबाई पाटील, सीमा पाटील, नंदिनी राजपूत, सागर कुलथे, राहुल चौधरी, रेखाबाई जळोदकर, प्रथमेश पाटील, पियुष पवार, शिवाजी लोहार आदी सहभागी झाले होते.