खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून केले जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) पांझरा नदी पात्रातून वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडत मारवड पोलीस ठाण्यात जमा केले आहे. तालुक्यातील शहापूर येथे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ५ सप्टेंबर रोजी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहापूर येथील पांझरा नदी पात्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रॅक्टर एक ब्रास वाळूसह मुद्देमालासह पोलीस स्टेशन मारवड येथे जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई मंडळ अधिकारी सुरेश आर. बोरसे, तलाठी जितेंद्र ए. जोगी, कोतवाल वासुदेव तिरमले, कोतवाल आधार सोनवणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button