खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

दूषित पाणी पिल्याने अमळगाव शिवारात एका शेतात विषबाधेने काळवीटाचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) दूषित पाणी पिल्याने विषबाधेने काळवीटाचा मृत्यू झाल्याची तालुक्यातील अमळगाव शिवारात एका शेतात घडली. याबाबत वनविभागाने माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अमळगाव-दोधवद शिवारात असलेल्या शेतात सदर शेतकरी सकाळी दैनंदिन कामकाजानिमित्त गेल्यावर मृत काळवीट नजरेस पडल्याने त्यांनी लागलीच सदर घटना वनविभागाला कळवली. वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे यांनी घटनास्थळी भेट देवून मृत काळवीट ताब्यात घेतले. अमळगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी सूरज बोरखडे यांनी पोस्टमार्टम केले व जानवे शिवारातील जंगलात आरएफओ शामकांत देसले यांच्या उपस्थितीत काळवीटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दूषित पाणी पिल्याने विषबाधेमुळे सदर काळवीटाचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button