खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेतील भूगोल, राज्यशास्त्र विषयावर केले महत्वाचे मार्गदर्शन

करिअर कौंसेलिंग सेंटर, प्रताप कॉलेज येथे आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा समारोप

अमळनेर (प्रतिनिधी) करिअर कौंसेलिंग सेंटर,प्रताप कॉलेज(स्वायत्त), येथे स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांनी स्पर्धा परीक्षा आणि भूगोल या विषयावर तर
कार्यशाळेचे समारोप प्रसंगी अॅड. चंद्रभान पाटील यांनी राज्यशास्त्र विषयावर मार्गदर्शन केले.
माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण असे दीड तासाचे व्याख्यान झाले.या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,सूर्यमाला,उत्तर गोलार्ध,दक्षिण गोलार्ध,अक्षवृत्त,महाराष्ट्राची प्राकृतिक रचना,बेट, मृदा,हवामान,प्रजन्य,अयन दिन,क्षितिज,नद्या,ऋतू,डोंगर या बाबत सूक्ष्म माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाना समाधानकारक उत्तरे दिली. प्रस्तुत समारंभाचे अध्यक्ष करिअर कौंसेलिंगचे प्रमुख डॉ विजय तुंटे हे होते,अतिथी म्हणून भूगोल विषयाचे प्रमुख डॉ कैलास निळे,डॉ महेंद्र महाजन,डॉ हर्षवर्धन जाधव हे होते. या वेळी वक्त्यांचा परिचय प्रा किरण गावित यांनी करून दिला.सूत्र संचालन व आभाराचे कार्य प्रा ज्ञानेश्वर कांबळे यांनी पार पाडले.
या प्रसंगी डॉ. राखी घरटे,प्रा. सोनूसिंग पाटील,प्रा शिरसाठ,प्रा भूषण पवार,प्रा जाधव चंद्रकांत यांच्यासह दिलीप शिरसाठ,मेहुल ठाकरे,हिमांशू गोसावी,अक्षय सोनार,अमोल अहिरे,विशाल अहिरे,राकेश धनगर आदींनी सहकार्य केले.

कार्यशाळेचा झाला समारोप

कार्यशाळेचे समारोप प्रसंगी अॅड. चंद्रभान पाटील बोलत होते.त्यांनी या वेळी पंचायत राज, राज्य घटना, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क,राज्य घटनेतिल विविध कलमे, आणीबाणीची तरतूद,आरक्षणाची तरतूद, अधिकारांचे संविधानिक विभाजन या संबंधी तास भर व्याख्यान दिले आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे सुद्धा दिली. या कार्यशाळे करिता प्राचार्य डॉ. अरुण जैन, संस्थेचे सहसचिव डॉ. धिरज वैष्णव, उप प्राचार्य डॉ. दिलिप निकुंभ, डॉ. जे. बी. पटवर्धन, डॉ कल्पना पाटील, डॉ. व्ही. बी. मांटे, राकेश निळे यांनी मार्गदर्शन केले. या समारोप समारंभाचे अध्यक्ष डॉ विजय तुंटे हे होते.त्यांनी पाच दिवसीय कार्यशाळेचा सविस्तर आढावा घेतला.प्रमुख वक्त्याचा परिचय ग्रंथपाल दिपक पाटील यांनी करून दिले. उपस्थित विद्यार्थ्या मधून जान्हवी जोशी,हिमांशू गोसावी यांनी पाच दिवसीय कार्यशाळेचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले. या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सूत्रसंचालन डॉ. प्रसाद मुठे यांनी केले. आभार डॉ. राखी घरटे यांनी पार पाडले. या वेळी प्रा सोनूसिंग पाटील,दिलिप शिरसाठ,मेहुल ठाकरे, हिमांशू गोसावी, अमोल अहिरे,विशाल अहिरे,अक्षय सोनार यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button