खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

नगराध्यक्ष चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा थाटात शुभारंभ, राज्यातील २२ संघ सहभागी 

अमळनेर (प्रतिनिधी) कृषिभूषण साहेबराव पाटील क्रीडा मंडळातर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर थाटात झाला. या स्पर्धेत राज्यातील २२ फूटबॉल संघ सहभागी झाले असून प्रत्येक संघातील खेळाडू मैदान गाजवत आहे.
खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल आणि पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी बांधकाम सभापती सुरेश पाटील , नगरसेवक संतोष पाटील, योगेश मुंदडा , मेजर राजेंद्र यादव, प्रा. अमृत अग्रवाल , संजय पाटील , गजू चव्हाण,जितेंद्र ठाकूर , भरत पवार , भटेश्वर वाणी, चंद्रकांत बारस्कर  उपस्थित होते. स्पर्धांचे आयोजन व पंच म्हणून प्रमोद गोयकर , पावन गोडसे , दिनेश शिंदे , सलमान पठाण,  पवन शिंदे यांनी काम पाहिले.

स्पर्धेत सहभागी झालेले राज्यातील २२ संघ असे 

या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती, अकोला , शेगाव , पुणे , पाचोरा , दोंडाईचा ,चोपडा , पारोळा  औरंगाबाद , मुंबई पोलीस , धुळे पोलीस , जळगाव पोलीस , वर्धा पोलीस , वर्धा , नंदुरबार , भुसावळ ,  धुळे एसआरपीएफ असे राज्यातील एकूण २२ संघ यात सहभागी झाले आहेत.

 

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

https://nmk.today/441/

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button