रणाईचे येथे अत्याधुनिक व्यायामशाळा व सभागृहचे थाटात लोकार्पण..अमळनेर(प्रतिनिधी)ज्या प्रमाणे गांधली पांझर तलावाचे काम पूर्णत्वास आणून शेतकऱ्यांना भूसंपदानाचा मोबदला व्याजा सहित मिळवून दिला, त्याचप्रमाणे लोटा बाळगी तलावसाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्याना मिळवून देणार व तलावाचे काम देखील लवकरात लवकर पूर्णत्वास आणून रनाईचे तसेच जानवे,डांगर बु.अंचलवाडी, व परिसरातील गावातील पाणी प्रश्न कायमचा सोडविणार अशी ग्वाही आ.शिरीष चौधरी यांनी रनाईचे येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना दिली.
रनाईचे येथे आ.चौधरी यांच्या प्रयत्नातून झालेल्या अत्याधुनिक व्यायामशाळा व सभागृहाचे थाटात लोकार्पण आ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.सदर विकासकामाबद्दल आमदारांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला,तसेच लोटा बाळगी पांझर तलावाचे काम त्वरित पूर्णत्वास आणावे या मागणीचे निवेदन आ चौधरी यांना देण्यात आले.सदर निवेदन स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात आ. चौधरी पुढे म्हणाले की ग्रामिण भाग टंचाईमुक्त व्हावा हेच आपले स्वप्न असून त्याअनुषंगाने वाटचाल करीत आहे,गांधली पिळोदा पांझर तलावाप्रमाणेच लोटा बाळगी पांझर तलाव पूर्णत्वास आणणे हे आपले लक्ष आहे,हा तलाव पूर्णत्वास आणल्यानंतर यात पांझरा नदीचे पाणी सोडून रनाईचे सह परिसरातील गावे टचाईमुक्त करण्याचा आपला ध्यास आहे,तसेच रनाईचे गावाचा राष्ट्रीय पेजयल अथवा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात येणार आहे.याआधी निर्सडी धरण, लोटा बाळगी धरण, मोर धरण, आर्डी धरण आदींचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यात आलेला आहे,माळण पूर्णभरण समितीचे कामही योग्य दिशेने सुरू असून त्यास माझा पूर्ण पाठींबा आहे.तसेच लोढवे-निसर्डी-खडके ते अंचलवाडी रस्त्यासाठी सुमारे 3 कोटी 67 लाख मंजूर करून जवळपास 6.5 कि.मी चे रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे, याव्यतिरिक्त अमळनेर- नवलनगर या 89 कोटींच्या रस्ताचे काम प्रगतीपथावर असून विकास हाच आपला अजेंडा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले,व शेवटी रणाईचे येथे व्यायाम शाळेसाठी साहित्य देण्याचेही जाहीर केले.
याप्रसंगी रनाईचे सरपंचा सौ दामिनी परीलाल भील, उपसरपंच दिलीप भिल, प्रतिभा पाटील, मिराबाई पाटील, रेखाबाई बैसाने, श्रावण वंजारी, संजय देवरे, मा. चेअरमन वि.का.सो भुषण पाटील, गोविंदा पाटील, किरण गोसावी, मा.उपनगराध्यक्ष अनिल महाजन, नगरसेवक बाळासाहेब सदांनशिव, धनंजय महाजन, सुनील भामरे, पंकज चौधरी, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील,आर्डी उपसरपंच किशोर पाटील, मा. सरपंच सावखेडे राजेंद्र पाटील, हिरामण पाटील,सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील जानवे, संतोष चौधरी, संजय पाटील, सुनील भोई, राजेंद्र चौधरी, कुंदन पाटील, दिनेश करणकाळ, रोशन सोनवणे, पारस धाप, राकेश चौधरी, प्रदीप इंसुलकर, सचिन परदेशी, भुषण पाटील, गुलाब आगळे, हेमंत चौधरी,ज्ञानेश्वर पाटील, बापु सांगोरे,धनराज पाटील, प्रमोद पाटील, धर्मराज पाटील, हेमंत पाटील, दिनेश पाटील, समाधान पाटील, अनिल पाटील, गुलाब पाटील, भाईदास वंजारी, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.