अमळनेर:(प्रतिनिधी) अमळनेर येथील सिंधी कॉलनी, तोलाणी मार्केट येथील गुरुदारांमधून भाऊबीजेपासुन ते गुरुनानक जयंती पर्यत दररोज सकाळी निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांनी वातावरण भक्तीमय बनले आहे. “धन गुरुनानक सारा जग तारीयां” या सारख्या भक्तीगीतांनी भाविकांमध्ये भक्तीचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसत आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीचा उत्सव सिंधी व शीख बांधवांतफे मोठ्या आनंदात साजरा करण्या त येणार आहे. या आधी झालेल्या अमृतवेला या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. सिंधी कॉलनीतील संत बाबा हासाराम दरबार साहेब येथून भाऊ बीजेपासुन दररोज सकाळी 4.30 ते 6 या दरम्यान प्रभात फेरी निघत असते. विविध भक्तीगीते म्हणत संपूर्ण परिसरात 400-500 भाविकांचा जत्था भक्तीपुण वातावरणात निर्माण करीत आहे. लहान मोठ्या वयोगटातील नागरीक महिला,मुले प्रभात फेरीत सहभागी होत असतो दानशूर व्यक्तींकडून भाविकांना चहा, कॉफी, केसरी दुध, अल्पोहाराचे वाटपही करण्यात येते. त्यानंतर 6 ते 7.30 या वेळेत भजन किर्तन, सत्संग कार्यक्रमासही श्रोत्यांची उत्साहपुर्ण उपस्थिती असते गुरुद्वाराचे हरीभाई साहेब यांच्यासह जय झुलेलाल मंदिराच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात येते. दि. 23 रोजी गुरुनानक जंयती निमीत विष्णूदास दरबार (भाई पुरण भाई साहेब गुरुद्वारा) येथुन मिरवणूक सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे. या निमित्त संत हासाराम दरबार येथे दु. 12 वा. महाप्रसाद, रात्री 10 वाजता पासुन जन्मोत्सव सोहळा होणार आहे यात धार्मिक सांस्कृतिक गीत सादर करण्यात येतील. रात्री 1.20 वा. जन्मोत्सव उत्साहात व फटा क्यांच्या आतषबाजीत साजरा करण्यात येणार आहे. तसेच दररोज सकाळी 5 वाजता गोपीचंद शर्मा (महाराज) व जितेंद्र भाई साहेब यांच्या मार्गदर्शना खाली प्रभात फेरी काढण्यात येते. यातही भाविकांचा मोठा सहभाग असतो. हरीभाई साहेब व संजय महाराज शर्मा,हितेश शर्मा, यश शर्मा, प्रकाश सोनार, सोमी तोला नी,नारायण तोलानी,कृष्णा तोलानी,प्रकाश जग्यानी,रोहीत बठेजा , आदींसह भाविक महिला, पुरुष या प्रभात फेरीत सहभागी होत असतात. सिंधी बाजारातील तोलाणी मार्केट जवळील भाई लुध डासिंग दरबार गुरुद्वारा येथूनही दररोज सकाळी ५ वा. प्रभात फेरी मोठ्या उत्साहात निघत आहे. सिंधी बाजार सैनानी नगर, स्वामी नारायण मंदीर मार्गे पुन्हा गुरुद्वारा असा प्रभातफेरीचा मार्ग आहे. सुमारे 250 पुरुष, महिला भाविकांची उपस्थिती असते. गुरुनानक जयंती निमित्त दि. 23 रोजी सायं. 6 ते 8 यावेळत भाई घनश्यामदास यांच्या सत्संग व किर्तन 8.30 वा भोगसाहेब (भोजन प्रसाद) व रात्री 1.20 वा. जन्मोत्सव अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदीप भाईसाहेब तोलाणी,किशन महाराज आदींसह भाविक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.