खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

धनदाई महाविद्यालयासह खवशी जिल्हा परिषद शाळेत राबवला ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रम

देशाच्या प्रगतीसाठी एकतेची व प्रयत्नांची शपथ घेत क्रांती व आदिवासी दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळांमध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश ” या उपक्रमांतर्गत देशाच्या प्रगतीसाठी एकतेची व प्रयत्नांची शपथ घेतली. तसेच क्रांती दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
धनदाई महाविद्यालयात कार्यक्रम अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत क्रांती दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक यांनी “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत देशाच्या प्रगतीसाठी एकतेची व प्रयत्नांची शपथ घेतली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर विचारपीठावर कार्यक्रमाधिकारी प्रा. महादेव तोंडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. जयवंतराव पाटील व डॉ. लिलाधर पाटील आदी उस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यानंतर डॉ. लीलाधर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रतिज्ञा घेण्याची प्रक्रिया समजून सांगितली गेली. 2047 पर्यंत भारत महासत्ता करण्यासाठी गुलामीची मानसिकता सोडून देशाच्या प्रगतीत आणि एकात्मतेत योगदान देऊ या आशयाची शपथ प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी उपस्थित त्यांना दिली.
याप्रसंगी क्रीडा संचालक डॉ. शैलेश पाटील यांनी प्रतिज्ञा वाचून दाखवली. कार्यक्रमास डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहूल इंगळे, डॉ. प्रविण पवार, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. मेघना भावसार, प्रा.अश्विनी पाटील, प्रा. रविंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५५ स्वयंसेवकांना यावेळी प्रमाणपत्र प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. महादेव तोंडे यांनी आभार मानले.

खवशी जि.प.उच्च प्राथमिक शाळेत कार्यक्रम

अमळनेर तालुक्यातील खवशी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित मेरी मिट्टी मेरा देश या अभियानअंतर्गत ९ ऑगस्ट रोजी पंचप्रण शपथ अभियान राबविण्यात आले.यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीपासून सुबक दिवे बनविले.दिव्यांच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी भारताच्या एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी क्रांतिदिन तसेच आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी नृत्यांवर विद्यार्थ्यांनी धमाल नृत्य केले. यावेळी मुख्याध्यापिक हिम्मत चौधरी,उपशिक्षक दिलीप कंखरे,पंकज शिसोदे,,अजय कोळी,पूनम पवार उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button