भजन सम्राट सुशीलजी गोपालजी बजाज यांचे जम्मा जागरण….अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील न्यू प्लॉट, महाराणा प्रताप मार्गच्या आराधना बिल्डिंगच्या प्रांगणात श्री बाबा रामदेवजी च्या विशाल जम्मा जागरण दि २ डिसेंबर वार रविवार रोजी ठेवण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यातील कळमसरा निवासी श्री प.पु.रामदेवजी शर्मा यांच्या आशीर्वादाने आणि श्री राधेश्याम मणियार यांच्या धर्मपत्नीच्या इच्छापुर्तीची (स्व सौ कौशल्याबाई मणियार ) पूर्तता करण्यासाठी अमळनेर येथे प्रथमच हैद्राबाद येथील प्रसिद्ध भजन सम्राट सुशीलजी बजाज यांच्या मुखारविंदानेच श्री बाबा रामदेव जीचा जम्मा जागरण होणार आहे.सविस्तर असे की ,दि २ डिसेंबरला दुपारी २ वाजे पासून विशाल जम्मा जागरणला सुरवात होणार असून रात्री १० वाजे पर्यंत जम्मा जागरण सुरू राहणार आहे . बाबा रामदेवजीच्या जन्मा पासून तर लग्ना पर्यंत संपूर्ण कथा भजन द्वारा कथन होणार आहेत यात बाबाचा जन्माचा देखावा, लग्नाचा देखावा असे अनेक देखावे ही पाहायला मिळणार आहेत यावेळी अमळनेर तालुक्यातील कळमसरा येथील श्री रामदेवजी शर्मा (बापजी ), धुळे जिल्ह्यातील वेल्हाणा येथील सौ.कमलबाई दुगगड (बापजी) हजर राहणार आहेत तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे,औरंगाबाद,अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो भक्त हजर राहणार आहेत तरी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मणियार परिवार व श्री महाराणा प्रताप मित्र मंडळ मदत करणार आहे तर वरील सर्व कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी हजर राहावे अशी विनंती श्री राधेश्याम मणियार परिवारा तर्फे दिनेश मणियार,प्रितेश (लाला) मणियार एवं समस्त मणियार परिवार आणि श्री महारा णा प्रताप मित्र मंडळ, अमळनेर यांनी केली आहे.