खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बालिकेच्या पीडित कुटुंबाला अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुपने केली आर्थिक मदत

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुपने भडगाव तालुक्यातील अत्याचारग्रस्त मयत बालिकेच्या अपंग वडिलांना आर्थिक मदत करून आरोपीस कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
भडगाव तालुक्यातील बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याने तिचे कुटुंब प्रचंड दुःखात आहे. बालिकेच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असून ते अपंग आहेत. त्यांचा रोजगार बुडाला आहे. अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप च्या अध्यक्ष ॲड ललिता पाटील,अनिता पाटील, डॉ.प्रतिभा मराठे यांनी त्या कुटुंबाची भेट घेऊन तातडीची आर्थिक मदत केली असून आरोपीस कठोर शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देखील त्या कुटुंबाला दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button