अमळनेर शहरा सह तालुक्यात आदिवासी जननायक, क्रान्तिविर बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, नगरपरिषद अमलनेर येथे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आली,या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजा माता कृषिभूषण सौ पुष्पलता साहेबराव पाटील ,मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांचे शुभहस्ते प्रतिमेस माल्यार्पण कर ण्यात आले, तसेच श्री श्याम पाटील, प्रशासन अधिकारी संजय चौधरी व सर्व कार्यालयातिल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
…………
बहुजन मुक्ती पार्टी तर्फे तालुकाध्यक्ष संदीप सैदाने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा आपल्या मनोगतात करून दिला.
……………….
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे गणेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यात प्रा जितेश संदांनशीव यांनी आपल्या भाषणातून क्रान्तिविर बिरसां मुंडा यांनी भाडवलंदार, जमीनदार व इंग्रजांच्या विरोधात प्रखर आंदोलन करून सळो की पळो केले होते, आदिवासीच्या जल, जंगल,जमिनींवर कब्जा करून अन्याय होत असल्याकारणा ने त्या विरुद्ध बंड पुकारले,त्यामुळे त्यांना लोकांनी आपला जन नायकाच्या भूमिकेत स्वीकारले आहे, अश्या अनेक आठवणींना उजाळा देऊन माहिती दिली, कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजू मोरे, विजय वाडेकर, फायज सर, शिवाजी पारधी, तडवी सर, मिलिंद निकम, प्रसाद बिऱ्हाडे, प्रमोद बिऱ्हाडे, पप्पू सोनवणे, प्रवीण बैसाने, यांनी सहकार्य केले.
……………..……
आदिवासी तरुण पिढी ने आदिवासी संस्कृती, रीतिरिवाजचे संरक्षण करावे.क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा आदर्श घ्यावा…
कार्यक्रममाच्या अध्यक्ष प्रा जयश्री साळुंके दाभाडेउलगुलान जिंदाबाद जोहार जिंदाबाद….
अबुवा दिशुम….अबुवा राज… च्या घोषणानी दणाणले.
सांगवी ता शिरपूर येथे दि १५ नोव्हेंबर धरती आबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिरसा मुंडा जयंती निमित्त महा रॅली चे आयोजन करण्यात आले होते. तसेच बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रक्रमाच्या अध्यक्ष प्रा जयश्री साळुंके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदिवासी तरुण पिढी ने जास्तीत जास्त शिक्षणाकडे आपले लक्ष दयावे, आदिवासी क्रांतिकारकाच्या बलिदानाची जाणीव ठेवावी आदिवासी संस्कृती आणि भाषा जतन करण्यासाठी पुढे यावे आज पारंपरिक आदिवासी नृत्य,वाद्य तरुण पिढी विसरत चालली आहे त्याबद्दल माहिती करून घ्यावी असे सांगत क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी त्यांनी आदिवासी एकता संघर्ष समिती चे टी शर्ट आदिवासी तरुणांना वाटप केले. महा रॅली मध्ये आदिवासी तरुण,महिला तरुणी नि मोठ्या प्रमाणात भाग घेतला.रॅली त “आमु अख्खा एक से”,”जय आदिवासी जय बिरसा”,”उलगुलान जरी रहेगा” इ घोषणांनी परिसर दणाणून उठला .आदिवासी गाण्यावर आदिवासी नृत्य करत सभा स्थळी रॅली पोहचल्या नंतर मान्यवरांनी क्रांती सूर्य बिरसा मुंडा डॉ बाबासाहेब आंबेडकर, उमाजी नाईक इ महा पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.कार्यक्रमात कृष्णा राठोड,कमलताई पावरा,मनोज पावरा, कस्तुरबाई बारेला इ मान्यवर उपस्थित होते.