राजमाता जिजाऊ महिला मंडळ तर्फे ,बचतगटातील महिलांसाठी नेतुत्व शिबीर…

बचतगट हे महिलांसाठी नेतुत्व विकासाचे साधन-श्रीकांत झाबंरे अमळनेर ( प्रतिनिधी ) बचतगट हे नेतुत्व विकासाचे प्रमुख मध्यम आहे. सध्या चूल आणि मूल सांभाळता- सांभाळता महिला घराबाहेर पडून उत्तम प्रकारे बॅंक वेवाहर करायला लागल्या आहेत. बचतगटाच्या बैठकीत चर्चा करणे’; गावातील वार्ड सभा, ग्रामसभा आणि स्वच्छ भारत यासारख्या उपक्रमात बचतगटातील महिलांचा वाढता सहभाग दिसून येतो. आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या महत्वाच्या विषयावर आता महिला जागृत झाल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य पासून ते पंचायतसमिती – जिल्हापरिषद पर्यंत महिला प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात नेतुत्व करीत आहेत. बचतगट नेतुत्व विकासाचे प्रमुख साधन ठरत आहे. नाबार्ड बॅंकेचे जळगांव, जिल्हा विकास प्रबंधक – श्रीकांत झाबंरे , राजमाता जिजाऊ महिला मंडळ अमळनेर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमळनेर येथिल मंगळ ग्रह सभागृहात ते बोलत होते. नेतुत्व गुण प्रत्येक व्यक्तीकडे जन्मजात असतो. परंतु त्याचा विकास करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. असेमत यशदा पुणे येथील माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षक प्रा. अशोक पवार यांनी व्यक्तकेले. राजमाता जिजाऊ महिला मंडळ या संस्थेच्या अध्यक्ष सौ.पुनम भटू पाटील म्हणाल्या की,जळगाव जिल्ह्यात आमच्या संस्थेचे १०० शेतकरी मंडळ आणि ७११ महिला बचतगट स्थापन केले आहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन व बॅंक जोडणी करून बचतगटातील सभासदांच्या कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी आमची संस्था काम करीत आहे. यशदा व नाबार्ड चे मास्टर ट्रेनर भटू पाटील ( भटू आबा ) यांनी नेतुत्व विकास व पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या या विषया वर प्रशिक्षण दिले. तर निवु रुत्त लेखा पाल शालिग्राम पाटील यांनी पंच सूत्री आणि बचतगटातील आचार संहिता शिकवली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत झाबरें नाबार्ड तर प्रमुख पाहुणे – प्रा. अशोक पवार, माधुरी पाटील उपाध्यक्ष खा. शि. मंडळ अमळनेर , अँड . मिनाक्षी साळुखे , विनोद गुलहाने मॅनेजर पंजाब नेशनलं बॅंक अमळनेर, मयूर पाटील मॅनेजर युनियन बॅंक शाखा अमळनेर, अनिल अहिरराव मॅनेजर जे. डी. सी. सी. बॅंक शाखा अमळनेर सौ. उज्वला पाटील बचतगट विभाग नगर परिष द अमळनेर, सुरभी सूर्यवंशी न. पा. अमळनेर, प्रगती पाटील, भरती पाटील, चेतनराज पाटील, शितल पाटील यांची उपस्थिती लाभली . मंगळ ग्रह मंदिर संस्था अध्यक्ष – श्री. राजू महाले सर व सचिव बाविस्कर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. टी. आर. भोई अध्यक्ष- महात्मा गांधी ग्रामिण विकास संस्था दोधवद यांनी प्रस्थावना केली. बी. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन तर हरीचंद्र कढरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *