गांधलीपुरा येथे महर्षी वाल्मिकी नवल स्वामी सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद आणि वाल्मिकी मेहतर समाज पंचमंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र.५ गांधलीपुरा येथे महर्षी वाल्मिकी नवल स्वामी सामाजिक सभा गृहाचे काम अंदजित रक्कम .३०,०००,०० (तिस लाख) चे भुमि पुजन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या शुभ हस्ते व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुल कृषिभूषण मार्ग ते ईदगाह जोडरस्ता काँक्रिटीकरणाचे काम .४०,९२,३७५ (चाळीस लाख ब्यानाऊ हजार तिनशे पंच्याहत्तर रुपये)चे भुमिपुजन आमदार सौ.स्मिताताई उदय वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी सौ.शोभाताई बाविस्कर, नगरसेवक , नगरसेवक तथा बांधकाम सभापती, श्री.मनोज पाटील नगरसेवक, नगर परिषद प्रशासन अधिकारी संजय चौधरी, साखरलाल महाजन विक्रांत पाटील.विक्की जाधव खाटीक समाज बांधव, समस्त वाल्मिकी मेहतर समाज पंच मंडळ ,श्री.नवलस्वामी बाबाजी गृप, श्री.रामदेवजी बाबा युवा मंडळ,श्रीराम युवा मंडळ, पहेलवान गृप जळगांव जिल्हा कार्यकर्ते तसेच मेहतर वाल्मिकी समाजाचे युवा कार्यकर्ते बंधु व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *