अमळनेर नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्ताशिवाय अतिक्रमण काढले….

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर: येथील कबरस्थान ते मरीआई माता मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला अडथळा ठरणारे तीन मोठे अतिक्रमण नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्ताशिवाय काढले रस्त्या चे काँक्रीटीकरण सुरू असताना बिरमा पिरू दिंगे,राजू ओंकार संदनशिव,कमलाबाई श्रावण संदनशिव यांचे अतिक्रमण असलेले पक्के घर,मोठे शेड व मंदिर काढण्याचे आदेश मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी अतिक्रमण पथक प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना दिल्यानन्तर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राधेश्याम अग्रवाल, चंद्रकांत बिऱ्हाडे, अविनाश बिऱ्हाडे, राकेश बिऱ्हाडे, सुरेश चव्हाण, जयदीप गजरे, विशाल सपकाळे यांनी जे सी बी मशीनच्या साहाय्याने काढून टाकल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *