अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर: नाशिक विभागात सी एम चषक स्पर्धाना अमलनेरातून प्रथमच शुभारंभ करण्यात आला असून कबड्डीचाय स्पर्धेत पुरुष गटात आदर्श संघ लोंढवे संघाने प्रताप कॉलेज संघावर मात करून विजयी ठरला तरर महिलांच्या संघात खाशी युवती संघ विजेता संघाने अंतिम सामन्यात आदर्श संघावर विजय मिळवला.देशातील सर्वात मोठ्या क्रिडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र सरकारने CM चषक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राती ल विधानसभा क्षेत्रात स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि महाराष्ट्रातुन अमळनेर विधानसभा क्षेत्राने खेळाडू नोंदणीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या स्पर्धेत आठ क्रीडा व चार सांस्कृतिक कला प्रकारचे आयोजन करण्यात आले आहे.या अनुषंगाने त्या स्पर्धेची सुरवात महाराष्ट्रातुन अमळनेर विधानसभा क्षेत्रातून सुरवात झाली, त्याचे उदघाटन खा.ए. टी. पाटील, विधान परिषद आमदार .स्मिता वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते प्रताप महाविद्यालयातील मैदानावर कबड्डी या खेळा पासून झाले,यावेळी आकाशात CM चषक नावाचे बलून सोडून स्पर्धेला सुरवात केली.एकूण चाळीस संघांनी आज सहभाग नोंद विला होता,विशेष बाब म्हणजे यामध्ये महिला संघांचीही उपस्थि ती ही कौतुकास्पद होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आ.स्मिता वाघ, उदघाटक खा.ए. टी. पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा ध्यक्ष उदय वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व खेळाडूना शुभेच्छा दिल्या.पं.स.सभापती वजा भिल, शाम अहिरे, प्रफुल्ल पवार,झुलाल पाटील, श्रीनिवास मोरे,जि. प.सदस्य सोनू भिल, खा.शि.मंडळाचे अध्यक्ष नीरज अग्रवाल, जिल्हा संयोजक कपिल पाटील, विस्तारक सचिन पाटील,दिपक पवार,रोहन मुंदडा,महेश पाटील, महेश देशमुख,जिजाबराव पाटील,दिनेश पाटील, तसेच सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते .
स्पर्धेसाठी पंच म्हणून के.एस.मोरे,एस.पी.वाघ,डी. डी. राजपूत,ए. के.अग्रवाल.संजय पाटील,महेश माळी,के.आर.बाविस्कर, जे.व्ही. बाविस्कर, आर.एल.पाटील,शाम शिंगाने, विनायक सूर्यवंशी, एन. डी. विसपुते,चंद्रकांत कंखरे, रोहन मुंदडा या क्रिडाशिक्षकांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वीततेसाठी तालुका CM चषक आयो जक राहुल पाटील,घनश्याम पाटील,सागर मोरे,सौरभ पाटील, दिनेश पाटील,रवी पाटील, कल्पेश पाटील,योगीराज चव्हाण,पवन साळुंखे,कुणाल गिरासे,राहुल चौधरी,भूषण जैन,विवेक पाटील यांनी परिश्रम घेतले.दररोज विविध स्पर्धा खेळवल्या जाणार असून खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचे वाद विवाद बाजूला सारून सांघिक व मित्रत्वाच्या भावनेतून स्पर्धा खेळाव्या अशा सूचना आ.वाघ यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल पाटील व सूत्र संचालन सरचिटणीस हिरालाल पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्ष अमळनेर आयोजित C.M.चषक क्रिडा स्पर्धेत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा आदर्श कबड्डी संघाने प्रताप काॅलेजच्या कबड्डी संघा वर ३५ पैकी२३ गुण मिळ वून सुमारे १२ गुणांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
सर्व यशस्वी खेळाडुंचे राजभवन येथे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी अभिनंदन केले.
कबड्डी संघातील यशस्वी खेळाडू विनोद पाटील,दिनेश चौधरी, आकाशपाटील,सतीषकोळी,भरत कोळी,कल्पेश कोळी,जयेश कदम,कुणाल मोरे,मयुर चौधरी,प्रविण देसले, फैजल शेख,दिपक पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.